Pune : बुधवारी रात्री पुण्यात आगीच्या दोन घटना , सुदैवाने जिवीतहानी नाही

एमपीसी न्यूज – पुण्यात बुधवारी (दि.12) रात्री दोन आगीच्या घटना घडल्या असून यात कोणतीही जिवीत हानी नाही. यामध्ये धायरी स्मशानभूमी शेजारी वॉशिंग सेंटरमध्ये (Pune) आग लागून सिलेंडरचा स्फोट तर हडपसर क्षेत्रिय कार्यालयसमोर एका इमारतीत हॅप्पी थेरपी सेंटरला आग लागली होती.

धायरी, रायकर मळा, स्मशानभूमी शेजारी रात्री अकरा वाजता एका वॉशिंग सेंटर मध्ये आग लागल्याची वर्दि अग्निशमन दलाकडे प्राप्त होताच नवले अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

 Pimpri : जातीच्या आधारावर असलेली श्रमव्यवस्था माणसाला कलंकित करते – मिलिंद आव्हाड

घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले की, स्मशानभूमी शेजारी एका वॉशिंग सेंटरमध्ये आग लागली आहे. जवानांनी अग्निशमन उपकरण बोल्ड कटरच्या सहाय्याने शटर उघडून आतमधे प्रवेश करत आगीवर पाण्याचा मारा करुन पंधरा मिनिटात आग पुर्ण विझवली.  (Pune) सदर ठिकाणी एका छोट्या सिलेंडरचा स्फोट झाला होता. तसेच याठिकाणी दोन दुचाकी ही व इतर साहित्य जळाले आहे. तर हडपसर क्षेत्रिय कार्यालय समोर एका इमारतीत हॅप्पी थेरपी सेंटरला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. जखमी कोणी नाही.

या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र येथील तांडेल निलेश पोकळे व वाहनचालक नरेश पांगारे व जवान अजित शिंदे, पृथ्वी नलावडे, विलास मचिंदर यांनी सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.