Chinchwad : गरजू कुटुंबांना मदत करून छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

एमपीसी न्यूज – श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि श्री विठ्ठल तरूण मंडळ वाल्हेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज जयंती गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत करून साजरी करण्यात आली. प्रतिष्ठान आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गरजू कुटुंबांच्या घरोघरी जाऊन मदत केली.

प्रतिष्ठानच्या दुगेश सुर्वे, अजिंक्य वाल्हेकर, तुषार जाधव, तेजस चिकणे, चेतन काजांवणे, सचिन यादव, सुमीत कांबळे, चेतन वाल्हेकर, सागर वाल्हेकर, अजित कदम, सूरज वाल्हेकर, आकाश खैरे, जुनेद शेख, विशाल पाटील, विशाल कंढाळे, सौरभ नढे, अमर तायडे, ऋषीकेश बदाले, आकाश पाडाळे, राजदिप राणा या कार्यकर्त्यांनी सर्व किट विविध भागांत घरोघरी जाऊन पोहोचवले.

वाल्हेकरवाडी परिसरात परप्रांतीय, मोलमजुरी करणारे, आजारी, काम करणारे, बंगाली समाज, जोशी समाज (नंदीबैल) अशा कुटुंबियांचे लॉकडाऊनच्या काळात हाल होत आहेत. त्यामुळे प्रतिष्ठान आणि मंडळाच्या वतीने 2 किलो तांदूळ, 2 किलो गहू, 2 किलो कांदे असे किट बनविण्यात आले. परिसरातील 47 गरजू घरांमध्ये जाऊन हे किट देण्यात आले.

‘शंभूजयंती मनामनात शंभूजयंती घराघरात’, असा संदेश देत छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.