Chinchwad : बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणा – भूषण आढे

एमपीसी न्यूज – स्पर्धा आहे यशस्वीसाठी होण्यासाठी ( Chinchwad)  नाविण्यपूर्ण शिक्षणाची कास अंगिकारा भविष्यात नोकरी का व्यवसाय करणार याची खुणगाठ आत्ताच बांधा,बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदला, असे मत व्हेरॉकचे मनुष्यबळ विभागाचे उच्च अधिकारी व व्याख्याते भूषण आढे यांनी व्यक्त केले.

ते चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा एमसीए व एमबीए विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय इंडक्शन कार्यक्रम आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व्हेरॉकचे मनुष्यबळ विभागाचे उच्च अधिकारी व व्याख्याते भूषण आढे यांनी केले.

यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, विभाग प्रमुख प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनिष पाटणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात व्याख्याते मोहन नायर, सॉफ्टस्कील प्रशिक्षक जयश्री फडणवीस आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

Pimpri : कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच केला सव्वा आठ लाख रुपयांचा अपहार

व्याख्याते भूषण आढे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले, तुमच्यातील चुका कशा टाळता येतील, याचे आत्मपरिक्षण स्वतःच करा. अनेकांना इंग्रजी समजते पण बोलताना अडखळतात ते टाळा, कॉर्पोरेट जगतात जाण्यासाठी टपोरी भाषाशैली ऐवजी मराठी, हिंदी भाषेबरोबर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवा. या दोन वर्षात जे आत्मसात करणार तेच भविष्यात कामाला येणार याची जाणीव ठेवा. पदवीग्रहण नंतर स्पर्धात्मक विश्वात पदार्पण करणार आहात, याची जाणीव ठेवत पाया भक्कम करा.  नोकरीची संधी मिळते पण, टिकविणे फार महत्त्वाचे असते.

प्रास्ताविकात संचालक डॉ. सचिन बोरगावे म्हणाले, दोन वर्षे महत्त्वाचे असून सातत्यपूर्ण अभ्यास करा, नवनवीन ज्ञान आत्मसात करा., शिकण्याची मिळालेली संधी सोडू नका. विषय समजून घ्या, भेडसावणारी प्रश्ने विचारा, उल्हासीत रहा. वेळेचे अचूक व्यवस्थापन करा. तुमचे भविष्य तुमच्याच हातात आहे., याची जाणीव ठेवा.

कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ. महिमा सिंग यांनी केले., आभार डॉ. निजी साजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. तूलिका चटर्जी, प्रा. प्रिया माथुरकर, प्रा. कविता दिवेकर यांनी विशेष परिश्रम ( Chinchwad) घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.