Chichwad Crime : पेट्रोल पंपावरील नऊ लाखांची कॅश चोरीला

एमपीसी न्यूज – पेट्रोल (Chinchwad Crime) पंपावर जमा झालेली सुमारे 9 लाखांची रोकड चोरीला गेली. ही घटना शनिवारी (दि. 19) रात्री पूर्णानगर, चिंचवड येथे भोसले पेट्रोल पंपावर घडली.

विशाल जगन्नाथ भोसले (वय 38, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Truck Accident Live Updates : इंधन वाचवण्याच्या चक्करमध्ये दिली वाहनांना धडक; पुणे पोलिसांचा खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा (Chinchwad Crime) पूर्णानगर येथे पेट्रोल पंप आहे. दिवसभर पेट्रोल पंपावर जमा झालेली नऊ लाख 99 हजार 936 रुपयांची रोकड त्यांनी ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने ड्रॉवरमधून चावी घेत त्यातील आठ लाख 93 हजार 136 रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.