Chinchwad Crime : कामाचे पैसे न दिल्याने पेंटरकडून मालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – कामाचे पैसे दोन दिवसांनी देतो असे म्हटल्याने पेंटरचे काम करणा-या कामगाराने मालकाला लोखंडी फायटरने मारून जखमी केले. ही घटना 3 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे घडली.

बाळासाहेब प्रल्हाद गंगावणे (वय 52, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे जखमी मालकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सचिन झुंबर जाधव (रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन हा फिर्यादी बाळासाहेब यांच्याकडे पेंटिंगचे काम करतो. त्याने बाळासाहेब यांच्याकडे दोन दिवस केलेल्या कामाचे पैसे मागितले. त्यावर बाळासाहेब यांनी सांगितले की, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. दोन दिवसानंतर मी तुझे पैसे देतो’ यावरून चिडून आरोपी सचिन याने बाळासाहेब यांना शिवीगाळ करत लोखंडी फायटरने तोडावर मारून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.