Chinchwad : अंध अपंग विकास असोसिएशन’चे संस्थापक दिनकर गायकवाड यांचे निधन

Dinkar Gaikwad, founder of Andh Apang Vikas Association, passed away

एमपीसी न्यूज : अंध अपंग विकास असोसिएशन’चे संस्थापक तसेच शामदिन इंडस्ट्रीज चे मालक दिनकर गायकवाड (73) यांचे आज (दि.4) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

त्यांच्या मागे त्यांची पत्नी ,भाऊ, पुतणे, पुतणी, तीन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे.

दिनकर गायकवाड हे  पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे जेष्ठ बंधू आहेत. दिनकर गायकवाड यांचे पिंपरी चिंचवड शहरात अंध, अपंग पुनर्वसन सामाजिक चळवळ उभी करण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.