Chinchwad : अविवाहित, घटस्फोटीत व विधवा मुलींना 24 वर्षानंतरही चालू राहणार कुटुंब निवृत्ती वेतन’; उमा खापरे यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने (Chinchwad) देखील शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या माता-पित्यांच्या अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटीत मुलींना कुटुंब निवृत्ती वेतन 24 वर्षा नंतरही मिळावे अशा अधिसुचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्या आहेत. सरकारच्या या महिलाबाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयाचे विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी स्वागत केले आहे.

केंद्र सरकार शासकीय सेवेत असलेल्या माता-पित्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतन हे अविवाहीत, घटस्फोटीत व विधवा मुलींना 24 वर्षानंतरही देते. याच नियमाप्रमाणे चिंचवड येथील प्रतिभा दिगंबर कुलकर्णी यांचे प्रकरण आमदार उमा खापरे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. यालाच सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 पेब्रुवारी 2024 रोजी अधिसुचना जारी केली.

Moshi : हॉर्न वाजवल्याचा जाब विचारला म्हणून तरुणीसह दोघांना मारहाण

महिलांचा केलेल्या (Chinchwad) या सन्मानाबद्दल येत्या 8 मार्च रोजी म्हणजे महिला दिनानिमित्त आमदार उमा खापरे या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस व राज्य सरकार यांचे आभार मानणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.