Moshi : हॉर्न वाजवल्याचा जाब विचारला म्हणून तरुणीसह दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज – विनाकारण पाठीमागून हॉर्न का वाजवला म्हणत (Moshi) तरुणीसह दोघांना मारहाण केली आहे. ही घटना मोशी येथे देहु-आळंदी रोडवर रविवारी (दि.3) घडली.

याप्रकरणी शरमन नॉरमन आरलँड (वय 17 रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एम एच 14 जी.एच 9090 या गाडीमधील चालक व त्याचे तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mulshi : ग्रामीण भागातील महिलांशी ‘यशस्वी’ संस्थेचा संवाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना आरोपीने पाठी मागून येवून हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांनी विनाकारण का हॉर्न वाजवत आहे असे विचारले असता आरोपीने गाडी खाली उतरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर आरोपीचे साथीदार आले व त्यांनी फिर्यादीला लाकडी बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली.

फिर्यादीच्या मित्राला व त्याच्या बहिणीला देखील बांबूने मारहाण केली (Moshi) आहे. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.