Chinchwad: चिंचवडला संत गाडगेबाबा यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – राष्ट्रसंत गाडगे बाबा सेवाभावी संस्था व शिवगर्जना ग्रुप यांच्या वतीने केशवनगर चिंचवड येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले.

चिंचवड येथे यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आला. संत गाडगे बाबा चौक,व काकडे टाऊन शिप परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमध्ये संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. या वेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, महाराष्ट्र महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे, नरेश कदम , किरण लोंढे ,  दिलीप शिंदे , सुनील अभंग , प्रशांत दळवी , आकाश जवळकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी संत गाडगे महाराजांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले नरेश कदम यांनी प्रास्ताविक केले. किरण लोंढे यांनी सूत्रसंचालन  केले. सुनील अभंग यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.