Chinchwad : श्री महालक्ष्मी देवीसमोर शेकडो महिलांनी केले श्रीसूक्त पठण’

एमपीसी न्यूज – श्री महालक्ष्मी देवीची आराधना करण्यासाठी (Chinchwad)सामुदायिक श्रीसूक्त पठणाचे आयोजन शाहूनगर, चिंचवड येथील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले होते. सुमारे 350 भाविकांनी सहभाग सहभाग घेतला होता.

धर्मवीर संभाजीराजे मंच व संस्कृती संवर्धन व विकास महासंघ वतीने (Chinchwad)सामुदायिक श्री सूक्त पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिरासमोर करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे मंचाचे पांडुरंग पाटील, संजय पाटील, डॉ. अजित जगताप, शिवानंद चौगुले, अर्चना सोनार, हर्षल मुळुक, दिनेश म्हाबदी, तानाजी पवार, चंद्रकांत सोनार, पुजारी योगेश जोशी यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

Pimpri : अरविंद एज्युकेशन सोसायटीतर्फे भोंडला, थुंकीमुक्त रस्ता अभियान, पर्यावरण जनजागृती

शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेला हा आदिशक्तीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरु आहे. ‘संस्कृती संवर्धन महिला भजन महासंघ, चिखली विभागा’चे या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. रविवारी सकाळी श्री महालक्ष्मी मंदिरासमोर प्रसन्न वातावरणात महिला श्रीसूक्त सामुदायिकरीत्या पठण करण्याकरता एकत्र आल्या. त्यानंतर ध्यानधारणेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर सामुदायिक श्रीसूक्त पठणाला सुरुवात झाली. शंखनाद, मंत्रोच्चार आणि श्री सूक्तपठणातून चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. तर, फलश्रुती आणि आरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. भक्तीमय वातावरणात कार्यक्रम पार पडला. श्री सुक्त म्हणजे देवीची स्तुती आणि देवीचे सार्थ वर्णन असते असे डॉक्टर अजित जगताप यांनी नमूद केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुक्त पठणाची 16 आवर्तने करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.