Chinchwad : पवना नदीत दुषित पाणी सोडणारी लॉन्ड्री सील

एमपीसी न्यूज – पवना नदीत दुषित पाणी (Chinchwad) सोडणाऱ्या चिंचवडनगर येथील विघ्नहर्ता क्‍लिअरन्स लॉन्ड्री ऍन्ड ड्रायक्‍लिनर्स सर्व्हिसेसला महापालिकेने सील ठोकले आहे. तसेच लॉन्ड्री चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विघ्नहर्ता क्‍लिअरन्स लॉन्ड्री ऍन्ड ड्रायक्‍लिनर्स सर्व्हिसेसचे स्वप्निल ससे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवना नदीत केजूबाई बंधारा येथे 16 जुलै रोजी पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आला होता. याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

Alandi : आळंदीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी डोळे लागण रुग्णांमध्ये घट

यावेळी हॉटेल भैरव समोर, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडनगर येथील स्वप्निल ससे (Chinchwad) यांच्या मालकीच्या विघ्नहर्ता क्‍लिअरन्स लॉन्ड्री ऍन्ड ड्रायक्‍लिनर्स सर्व्हिसेस या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर या लॉन्ड्रीमधून ड्रायक्‍लिनमधील कपडे धुतलेले दुषित पाणी हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीत जात असल्याचे निदर्शास आले.

त्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.