Alandi : आळंदीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी डोळे लागण रुग्णांमध्ये घट

एमपीसी न्यूज : आळंदीमध्ये डोळे लागण रुग्णांच्या (Alandi) संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही घट झालेली दिसून येत आहे. आळंदी शहरातील शाळा व संस्थामध्ये दररोज मुलांची डोळे लागण तपासणी करण्यात येत आहे. तसेच, बाधित रुग्णांना औषधे देण्यात येत आहेत.

दिनांक 25 जुलै रोजी केलेल्या सर्व्हेनुसार, 20,496  बाधित रुग्णांमध्ये 359 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, आतापर्यंत आतापर्यंत एकूण 5371 रुग्ण बरे झाले आहेत.

Pavana Dam Update : पावसाची जोरदार बँटिंग; पवना धरण 70 टक्क्यांवर!

जिल्हा शल्य चिकित्सक आर. एम. ओ. वंदना जोशी, जिल्हा नेत्र (Alandi) पथक, डी. वाय. पाटील कॉलेज, तालुका वैद्यकीय अधिकारी यांची मनुष्यबळ आणि औषधे पुरवठा कामी बहुमोल मदत मिळाली. याबाबत वैद्यकीय अधिकारी उर्मिला शिंदे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.