Chinchwad : घराच्या दरवाजात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – बाहेर निघालेल्या वडिलांना निरोप देऊन घरात जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा कारमधून आलेल्या इसमाने हात धरून कारमध्ये बसण्याचा दम देत विनयभंग केला. ही घटना चिंचवड येथे बुधवारी (दि. 6) सकाळी सातच्या सुमारास घडली.

अभिषेक पांडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे वडील कामानिमित्त बुधवारी सकाळी सातच्या सुमारास बाहेर जात होते. त्यांना सोडविण्यासाठी पीडित मुलगी घराच्या गेटपर्यंत आली. वडील गेटबाहेर जाऊन काही अंतरावर थांबले. मुलगी घरात जात असताना आरोपी कार मधून आला. त्याने मुलीचा हात पकडला आणि कारमध्ये बसण्याचा दम देत तिचा विनयभंग केला. मुलीच्या वडिलांनी हा प्रकार पाहिला आणि ते कारजवळ आले असता आरोपी कार सोडून पळाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.