Chinchwad : कै.सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठानतर्फे नागपंचमीचा सण उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच नागपंचमीचा सोहळा उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

या निमित्ताने पारंपरिक खेळ प्रश्नमंजुषा,झिम्मा, फुगडी ,फेर, उखाणे इत्यादींच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यासाठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते. या मध्ये शाहूनगर, संभाजीनगर, शिवतेजनगर,पूर्णानगरमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, प्रा. हरिनारायण शेळके, राहू गुणवंत, संतोष शेळके, मंगेश पाटील, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ अध्यक्षा अर्चना तोडकर यांच्या वतीने विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. हा सोहळा पार पाडण्यासाठी अंजली देव, सारिका रिकामे, प्रीती झोपे, तारामती बहिरवाडे, श्रद्धा बहिरवाडे, स्नेहा गुणवंत, नीलिमा भंगाळे, रेखा शेळके, अक्षदा देशपांडे, सविता राणे, नेहा अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.