Chinchwad : मोहननगर व्यापारी संघटनेचा नवनियुक्त पदाधिकारी ‘पदग्रहण सोहळा’ संपन्न

एमपीसी न्यूज : मोहननगर व्यापारी संघटनेचा (Chinchwad) नवनियुक्त पदाधिकारी ‘पदग्रहण सोहळा’ गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता मोहननगर मधील श्री महादेव मंदिर येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोहननगर परिसरातील सर्व व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, हातगाडी चालक, टपरी धारक, उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.  

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जेष्ठ व्यापाऱ्यांच्या हस्ते पदग्रहण केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

येणाऱ्या काळात जर कोणी समाजकंटकांमार्फत अनुचित घटना घडवण्याचा प्रयत्न केला अथवा कोणा व्यापाऱ्यास त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोणाचीही भीती न बाळगता निर्भयतेने सर्व व्यापारांनी एकत्रितपणे समस्येचा बंदोबस्त करू” अशी ग्वाही संघटनेचे अध्यक्ष कमलेश दिलीप मुथा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली. हे करत असताना कोणाचीही गय केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. तसेच या पुढे ‘चुकीला माफी नाही’ असा इशाराही संघटनेचे अध्यक्ष कमलेश दिलीप मुथा यांनी दिला.

संघटना ही प्रत्येक सभासदामुळे मजबूत होते आणि प्रत्येक सभासद संघटनेमुळे मजबूतपणे उभा आहे; असे संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष मनोज शिंदे यांनी सांगितले.  त्याच प्रमाणे मागिल काही महिन्यांपूर्वी काही अनुचित घटना मोहननगर परिसरात घडल्या होत्या. त्यावेळी सर्वच पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक समाजसेवक, आजी माजी नगरसेवक, स्थानिक नागरिक यांनी व्यापाऱ्यांची साथ दिली. व्यापाऱ्यांना अडचणीच्या काळात मदत केली. यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्याचा ठराव संस्थेचे दुसरे कार्याध्यक्ष कमलेश लुंकड यांनी सादर केला.

व्यापाऱ्यांचा तक्रारींची गंभीर दखल घेत तसेच सुमारे 700 स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिस प्रशासनाने सुद्धा व्यापाऱ्यांना खूप मदत केली. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, तत्कालीन पोलिस उपायुक्त विवेक पाटील, तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने तसेच मोहननगर पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग यांनी आरोपींवर कडक कारवाई करून परिसरात भयमुक्त व सुरक्षित वातावरण निर्माण केले. यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना व नागरिकांना (Chinchwad) दिलासा मिळाला. म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता गुळिग यांना संघटनेतर्फे ‘व्यापारी मित्र पुरस्कार 2024’ जाहिर करण्यात आला.

संस्थेची कर्यकरणी पुढील प्रमाणे  –

अध्यक्ष :   कमलेश मुथा.
कार्यअध्यक्ष : कमलेश लुंकड.
कार्यअध्यक्ष :   मनोज शिंदे.
खजिनदार :   अशोक शेलार.
उपखजिनदार :   रमेश जाट.
सेक्रेटरी :  रंनजीत ननवरे.
उपसेक्रेटरी :  हिराराम चौधरी.
वरिष्ठ उपाध्यक्ष :  संजय मानूरकर.
उपाध्यक्ष :   दिनेश चौधरी.
उपाध्यक्ष :  मुकेश चौधरी.
उपाध्यक्ष :  मनोज शर्मा.
सदस्य :  वीरेंद्र कुमारराम.
सदस्य :  किशोर लुंकड.
सदस्य :  संदीप कोकरे.
सदस्य :  विलास पाटील.
सदस्य :  जावेद शेख.
सदस्य :  शिवा गोणते.
महिला सदस्य : अश्विनी मदने.
महिला सदस्य : आशा लोणकर.
महिला सदस्य :  रुपाली लोहार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.