Chinchwad News : शेअर बाजारात गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा होईल, असे अमिष दाखविले. 50 लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यापैकी दहा लाख रुपये परत केले. उर्वरित 40 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 ते 8 मार्च दरम्यान लिंकरोड, चिंचवड येथे घडली.

अजित कृष्णाजी देवळे (वय 57, रा. सुखवानी उद्यान, लिंक रोड, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. 18) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ब्रोकर प्रकाशभाई, अनिलभाई (दोघेही रा. गुजरात), अनिल सुतार, प्रिया पटेल अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी प्रिया पटेल हिने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून शेअर बाजारातील टीप देऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे आमिष दाखविले. आरोपी महिलेच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी आरोपीच्या खात्यावर 50 लाख दोन हजार रुपये पाठविले. त्यापैकी आरोपी यांनी नऊ लाख 77 हजार 110 रुपये परत केले. उर्वरित 40 लाख 24 हजार 890 रुपये परत न करता फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.