Chinchwad News : शहरातील 412 पोलिसांना कोरोनाची लागण; पोलीस उपायुक्तही पॉझिटिव्ह

कोरोनाची लागण झालेले पोलीस उपायुक्त रुग्णालयात दाखल आहेत. सौम्य लक्षणे जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 412 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 48 अधिकारी आणि 363 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील तीन दिवसांपूर्वी शहरातील एका पोलीस उपायुक्तांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण झालेले पोलीस उपायुक्त रुग्णालयात दाखल आहेत. सौम्य लक्षणे जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शहर पोलीस दलातील 48 अधिकारी आणि 363 पोलीस कर्मचारी असे एकूण 412 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 43 अधिकारी आणि 316 कर्मचारी कोरोनामुक्त देखील झाले आहेत. सध्या 5 अधिकारी आणि 47 कर्मचाऱ्यांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांचा जनतेशी थेट संबंध येत असल्याने कोरोनाचा पोलिसांना अधिक धोका आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी खबरदारी घ्यावी लागत आहे.

कोरोनाची खबरदारी घेणे, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही तिहेरी कसरत पोलिसांना करावी लागत आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा 30 ऑगस्ट रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.