Wakad crime News : डांगे चौकात सिग्नल ओलांडणाऱ्या दुचाकीला कारची धडक; अल्पवयीन दुचाकीस्वार ठार

अपघात घडल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता कारसह पसार झाला.

एमपीसी न्यूज – डांगे चौकात सिग्नल ओलांडणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवारी, दि. 15) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.

किरण संदीप नखाते (वय अंदाजे 17, रा. दत्तनगर, वाकड) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराचे नाव आहे.

किरण नखाते सकाळी साडेनऊच्या सुमारास डांगे चौकातून ताथवडेच्या दिशेने दुचाकीवरून जात होता. डांगे चौकातील सिग्नल ओलांडून ताथवडेच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात आलेल्या एका प्रवासी कारने किरणच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात किरण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता कारसह पसार झाला.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.