Chinchwad News: हजारो दिव्यांनी उजळला शनिमंदिर परिसर

एमपीसी न्यूज – पूर्णानगर विकास कृती समिती, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवसाई प्रतिष्ठान, सद्गुरू फाऊंडेशन, एकता प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद, जनकल्याण प्रतिष्ठान, शिवपूर्णा प्रतिष्ठान पूर्णानगर आणि शिवतेजनगर च्या सर्व सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य दिपोत्सव सोहळा घेतला. हजारो दिव्यांनी शनिमंदीर परिसर उजळून निघाले.

दिप प्रज्वलन पूर्णानगर येथील जेष्ठ कलावंत वसंत अवसरीकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके, वाणी सर ,सराफ काका या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. शनि मंदिराचा परिसर तीन हजार दिव्यांच्या रोषणाईने सजविण्यात आला होता. रांगोळ्यांची आरास दिव्यांनी उजळून निघाली होती. अतिशय मनमोहक दृश्य निर्मिती करण्यात आली होती. याप्रसंगी परिसरातील जेष्ठ नागरिक, महिला वर्ग युवा पिढी अतिशय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, सुनील कदम, शैलेश मोरे, ज्योती गोफणे, अनिल सोमवंशी, सारिका पवार, विकास गर्ग, अनिकेत पवार यांनी केले होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.