Chinchwad News: गुरुकुलममध्ये ‘गझलरजनी’ ; नऊ तासांच्या गजल सफारीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

एमपीसी न्यूज – गझलपुष्प संस्थेच्या वतीने आयोजित तिसरा ‘गझलरजनी’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. रात्री नऊ ते पहाटे सहा वाजेपर्यंत असे नऊ तास चालणा-या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पद्मश्री गिरीश प्रभुणे संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, चिंचवड येथे शनिवारी (दि.12) हा कार्यक्रम पार पडला. 
https://www.youtube.com/watch?v=cmHfQQGGEJ8
कार्यक्रमाचे उद्घाटन वकील सतीश गोरडे यांच्या हस्ते आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या उपस्थितीत पार पडले. गझलपुष्पचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी प्रास्ताविक करताना गझलपुष्प समूह आणि त्यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सुहास घुमरे यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले.
वकील सतीश गोरडे म्हणाले, ‘गझलपुष्प समूह हा गझलेच्या प्रसारासाठी खूप कष्ट घेत आहे. महाराष्ट्रभरातून नामवंत गझलकार पिंपरी चिंचवड मध्ये येऊन असा अद्वितीय कार्यक्रम साजरा करतात ही दखल घेण्यायोग्य बाब आहे.’ क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या आणि गझलपुष्पच्या संयुक्त विद्यमाने भविष्यात असे मोठ्या स्तरावर कार्यक्रम घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
महाराष्ट्रभरातून रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील 50 गझलकारांनी तब्बल 200 गझला सादर केल्या.
गझल कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गझलपुष्प समूहाचे सदस्य नंदकुमार मुरडे, रघुनाथ पाटील, संदीप जाधव, अभिजित काळे, सुहास घुमरे, निलेश शेंबेकर, महेश खुडे, प्रदीप तळेकर आणि प्रशांत पोरे यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.