Chinchwad News : शहर पोलीस दलातील पोलीस अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. नऊ पोलीस निरीक्षकांची अंतर्गत बदली झाली आहे. दोन पोलीस निरीक्षकांना बंदोबस्ताच्या कारणास्तव संलग्न करण्यात आले आहे. तर एका पोलीस निरीक्षकाला प्रशासकीय कारणासाठी संलग्न करण्यात आले आहे. याबाबत शनिवारी (दि. 8) पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आदेश दिले आहेत.

# अंतर्गत बदली झालेले पोलीस निरीक्षक

रंगनाथ बापू उंडे (नियंत्रण कक्ष ते पिंपरी वाहतूक विभाग)
डॉ. अमरनाथ रामचंद्र वाघमोरे (नियंत्रण कक्ष ते तळवडे वाहतूक विभाग)
विजया विलास करांडे (नियंत्रण कक्ष ते निगडी वाहतूक विभाग)
शंकर रामभाऊ डामसे (नियंत्रण कक्ष ते निगडी पोलीस ठाणे – ओटा स्कीम)
सुनील जयवंत पिंजण (नियंत्रण कक्ष ते शस्त्र विरोधी पथक)
वर्षाराणी जीवंधर पाटील (नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे)
ज्ञानेश्वर बबन काटकर (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट एक)
मच्छिन्द्र रमाकांत पंडित (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा युनिट चार)
प्रसाद शंकर गोकुळ (गुन्हे शाखा युनिट चार ते एमओबी / पीसीबी)

# बंदोबस्त, कामकाजाच्या दृष्टीने प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आलेले पोलीस निरीक्षक

राजेंद्र पांडुरंग बर्गे (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे)
मनोज बाबुराव खंडाळे (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)

# प्रशासकीय कारणास्तव संलग्न करण्यात आलेले पोलीस निरीक्षक

रावसाहेब बापूराव जाधव (देहूरोड पोलीस ठाणे ते पोलीस कल्याण शाखा)

# अंतर्गत बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक

गणेश गोविंद पवार (पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक ते आर्थिक गुन्हे शाखा)
अंबरीश संजय देशमुख (गुन्हे शाखा युनिट चार ते शस्त्र विरोधी पथक)

# अंतर्गत बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक

तुकाराम हरिश्चंद्र शेळके (नियंत्रण कक्ष ते पोलीस उपायुक्त गुन्हे यांचे वाचक)
महेश ज्ञानदेव मुळीक (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे)
श्रीनिवास आबासाहेब दराडे (नियंत्रण कक्ष ते सांगवी पोलीस ठाणे)
स्वप्नील भगवान वाघ (नियंत्रण कक्ष ते चिखली पोलीस ठाणे)
शरद दलसिंग शिंपने (नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे)
पौर्णिमा आनंदराव कदम (नियंत्रण कक्ष ते भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे)
प्रशांत राजेंद्र रेळेकर (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा – ओटीसी पथक)
बाळासाहेब लक्ष्मण आढारी (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा)
संतोष ज्ञानदेव लांडे (नियंत्रण कक्ष ते चाकण पोलीस ठाणे)

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्याकडे प्रशासन व विशेष शाखेची जबाबदारी

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांना नुकतीच पोलीस निरीक्षक ते सहाय्यक आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. त्यांची बढतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पदस्थापना करण्यात आली आहे. त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन या पदावर तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखेचा अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.