Pune News: कारमधून प्रवास करताना मास्क कम्पल्सरी आहे की नाही? नागरिक संभ्रमात

एमपीसी न्यूज: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला असून त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणार्‍यावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसात पोलिसांनी दोन हजार अधिक नागरिकांवर विना मास्कची कारवाई केली आहे. दरम्यान चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना मास्क घालायचा की नाही यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. पहिल्या लाटेदरम्यान चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यानांही मास्कची सक्ती होती. परंतु आता मात्र त्याबाबत पोलिसांना सूचना नसल्याने पोलीसही संभ्रमात पडले आहेत.

कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या नाही मास्कची सक्ती करण्यात आली होती. या नियमांचा भंग केल्यामुळे अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला होता. याबद्दल अनेकांनी नाराजी दर्शवली होती. परंतु तरीदेखील चार चाकी वाहन आतही मास्क ची सक्ती लागू करण्यात आली होती.

दरम्यान आता राज्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असताना संसर्ग वाढू नये म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरात निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः वीणा मास्क आढळणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे शहर पोलिसांनी तीन दिवसांपासून शहरात कारवाई सुरू केली आहे. सध्या तरी शहरात पोलिसांकडून समजावून सांगण्यावर भर दिला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.