Pimpri News : 15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारी 25 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

18 वर्षांपुढील नागरिकांना सोमवारी 41 केंद्रांवर कोविशील्ड तर 10 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारी (दि. 3) आणि मंगळवारी (दि. 11) 25 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस मिळणार आहे. तर 18 वर्षांपुढील नागरिकांना सोमवारी आणि मंगळवारी ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांना खालील केंद्रांवर मिळणार लस

ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी सेंटर, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण (समवारी बंद, मंगळवारी सुरु), फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, प्रेमलोक पार्क दवाखाना, पुनावळे दवाखाना पुनावळे, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अजमेरा, हनुमंतराव भोसले दवाखाना नेहरूनगर, महापालिका कन्या शाळा चिखली (सोमवारी बंद, मंगळवारी सुरु), महापालिका शाळा जाधववाडी (सोमवारी बंद, मंगळवारी सुरु), नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, जुने भोसरी रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरू शाळा च-होली, काळभोर गोठा उर्दू शाळा यमुनानगर, प्राथमिक शाळा 92 म्हेत्रे वस्ती, भानसे स्कुल यमुनानगर, घरकुल दवाखाना चिखली (सोमवारी बंद, मंगळवारी सुरु), नवीन जिजामाता रुग्णालय, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, कासारवाडी दवाखाना, अहिल्यादेवी होळकर सांगवी महापालिका शाळा, दापोडी दवाखाना.

18 वर्षांवरील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील सह्व्याधी असलेल्या नागरिकांना दुस-या डोसनंतर 9 महिने अथवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तर अशा नागरिकांना प्रिकॉशन डोस देखील खालील केंद्रांवर मिळणार आहे.

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, कै शिवाजी भोईर सांस्कृतिक सभागृह केशवनगर चिंचवड, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, किवळे दवाखाना, बिलजीनगर दवाखाना, जुने तालेरा रुग्णालय (सकाळी नऊ ते रात्री आठ), जिल्हा परिषद शाळा ताथवडे, मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्लीनिक वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, क्वालिटी सर्कल भोसरी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी, महापालिका कन्याशाळा चिखली.

महापालिका शाळा जाधववाडी, बाबाजी पांडू भांडे पिंपळे निलख दवाखाना, महापालिका शाळा वाकड, महापालिका क्रीडा संकुल कावेरी नगर, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, माजी सैनिक भवन दत्तनगर दिघी, सखुबाई गवळी गार्डन भोसरी, महापालिका बहुउद्देशीय तालीम इमारत बोपखेल, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी (सकाळी नऊ ते रात्री आठ), काळभोर गोठा बालवाडी यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, घरकुल दवाखाना चिखली, ठाकरे शाळा रुपीनगर, विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, नूतन शाळा ताम्हाणेवस्ती, महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय, दीनदयाल शाळा संत तुकाराम नगर पिंपरी (सकाळी नऊ ते रात्री आठ), शकुंतला शितोळे शाळा वेताळ महाराज सोसायटी जुनी सांगवी, बालाजी लॉन्स जुनी सांगवी, निळू फुले नाट्य गृह पिंपळे गुरव, वायसीएम रुग्णालय ओपीडी गेट नंबर एक या 41 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 वर्षांवरील नागरिकांना या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील सह्व्याधी असलेल्या नागरिकांना दुस-या डोसनंतर 9 महिने अथवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तर अशा नागरिकांना प्रिकॉशन डोस देखील खालील केंद्रांवर मिळणार आहे.

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अजमेरा, नवीन थेरगाव रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, नवीन जिजामाता रुग्णालय, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 10 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, वायसीएम रुग्णालय ओपीडी गेट नंबर एक (दुपारी दोन ते रात्री 8), अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.