Chinchwad News : शहरातील साहित्यिकांनी दिला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या आठवणींना उजाळा

एमपीसी न्यूज : शहरातील सर्व साहित्यिकांचा समावेश (Chinchwad News) असलेल्या साहित्य संवर्धन समितीच्या वतीने मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि 86 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उत्कट आठवणी सांगत लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते यांनी चिंचवड गावात जिजाऊ पर्यटन केंद्र येथे आदरांजली वाहिली.

पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, की “माझ्या सामाजिक प्रयत्नांचे साक्षीदार आणि मार्गदर्शक होते डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. मोठेपणा नव्हता. पुरोगामी विचार पेरण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवडचे बौद्धिक वैभव हरपले आहे.”

माणसांशी संवाद साधणारे, नम्र अन् अभ्यासू व्यक्तिमत्व हरपले असे डॉ. धनंजय भिसे म्हणाले. श्रीकांत चौगुले यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. राज अहेरराव, राजेंद्र घावटे, नाना शिवले, प्रदीप गांधलीकर, सविता इंगळे, शोभा जोशी, सुहास घुमरे, प्रकाश निर्मळ, मधुश्री ओव्हाळ,विवेक कुलकर्णी, हेमंत जोशी, साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, तानाजी एकोंडे, निशिकांत गुमास्ते, नंदकुमार कांबळे, राजू जाधव, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, राजेंद्र भागवत, उज्वला केळकर, फुलवती जगताप, आश्र्विनी कुलकर्णी, चिंतामणी कुलकर्णी, संगीता सलवाजी, किशोर आवारे, अंकुश ढोरे, शामला पंडित या (Chinchwad News) सर्व साहित्यिकांनी डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना आदरांजली समर्पित केली.

Pimpri Crime : गांजा सेवन करणाऱ्या दोघांना पिंपरी येथून अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.