Chinchwad : प्रतिभा ज्युनिअर महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनीनी जाणून घेतले महिला आरोग्याचे महत्त्व

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला (Chinchwad) शिक्षण संस्थेच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘स्टुडंट्स वेलफेअर कमिटी अंतर्गत’ अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींना महत्वाचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिला समस्या अभ्यासक सोनाली गांधी यांनी मुलींना महिला आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. 

यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास उपप्रचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, समन्वयिका प्रा. जसमीन फरास, प्रा.वैशाली देशपांडे तसेच सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.

Chakan : कांद्यासह वाटाणा व हिरवी मिरचीचे भाव तेजीत; एकूण उलाढाल 6 कोटी 60 लाख रुपये

सोनाली गांधी यांनी महिलांच्या अनेक वाढत्या समस्या व त्याची कारणे ही सांगितली. स्त्रीच्या जीवन प्रवासात अनेक बदल होत असतात हार्मोन्स बदल होत असतात. त्यामुळे मुलींनी बालिका व कुमारवयापासून स्वतःची काळजी घेतली (Chinchwad) पाहिले. त्यासाठी अंतरवस्त्रपासून सुरुवात करावी अनेक मुलींना माहीत नसते अंतरवस्त्र कसे कोणते वापरावे. योग्य पद्धतीचे अंतरवस्त्र वापरल्यास स्त्रियांचे अनेक आजार टाळू शकतो, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मुलींशी संवाद साधून अनेक समस्यांवर उपायही सांगितले. या कार्यक्रमास मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा.सुकन्या बॅनर्जी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.