Chakan : कांद्यासह वाटाणा व हिरवी मिरचीचे भाव तेजीत; एकूण उलाढाल 6 कोटी 60 लाख रुपये

एमपीसी न्यूज –  खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत भूईमुग शेंगाची आवक घटून भाव ( Chakan) स्थिर राहिले. लसणाची आवक स्थिर राहून भाव गडगडले. हिरव्या मिरचीची प्रचंड आवक होउन भाव तेजीत राहिले. फळभाज्यांच्या बाजारात कोबी, फ्लॉवर व वांग्याची आवक घटली. शेवग्याची आवक व भाव स्थिर राहिले. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व पालक भाजीची आवक घटली. मेथी व शेपूच्या भावात वाढ झाली.

जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल व म्हैस यांच्या संख्येत घट झाली. शेळ्या – मेंढ्याच्या संख्येत वाढ झाली.  एकूण उलाढाल 6  कोटी, 60  लाख रुपये झाली.चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 13 हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 7250 क्विंटलने वाढून भावात 800  रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 1600 रुपयांवरून 2400 रुपयांवर पोहोचला. बटाट्याची एकूण आवक 1900 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 500  क्विंटलने वाढूनही भावात 100 रुपयांची वाढ झाली.

बटाट्याचा कमाल भाव 1800 रुपयांवरून 1900 रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमुग शेंगाची एकूण आवक 5  क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक दुपटीने घटूनही कमाल भाव 10 हजार रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक 30  क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली व भावात 5 हजार रुपयांची घट झाली. लसणाचा कमाल भाव 25  हजार रुपयांवरून 20 हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक 375  क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 225 क्विंटलने वाढूनही भावात मोठी वाढ झाली. हिरव्या मिरचीला 3 हजार रुपयांपासून ते 5 हजार रुपयांपर्यंत भाव ( Chakan)  मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे –
कांदा – एकूण आवक – 13000  क्विंटल. भाव क्रमांक 1.2,400  रुपये, भाव क्रमांक 3 . 1700  रुपये, भाव क्रमांक 3. 1500  रुपये.
बटाटा – एकूण आवक – 1900  क्विंटल. भाव क्रमांक 1.1900 रुपये, भाव क्रमांक 3 . 1500  रुपये, भाव क्रमांक 4 .1300 रुपये.

फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – 300 क्विंटल ( 1000 ते 2000  रू. ), कोबी – 170 क्विंटल ( 1400 ते 1700 रू.), फ्लॉवर – 182 क्विंटल ( 1500  ते 2000  रु.), वांगी – 83 क्विंटल ( 1500  ते 2500  रु.), भेंडी – 82  क्विंटल ( 2500 ते 3500रु.), दोडका – 48  क्विंटल ( 4000 ते 5000  रु.), कारली – 64  क्विंटल ( 2500  ते 3500 रु.), दुधीभोपळा – 61  क्विंटल ( 1000 ते 1500 रु.), काकडी – 63 क्विंटल ( 1500 ते 2500 रु.), फरशी – 45 क्विंटल ( 2000  ते 3000रु.), वालवड – 62  क्विंटल ( 3000 ते 5000 रुपये), गवार – 40 क्विंटल ( 4000 ते 6000 रुपये, ), ढोबळी मिरची – 174  क्विंटल ( 3000 ते 4500 रु.), चवळी – 28  क्विंटल ( 2000 ते 3000  रु.), वाटाणा – 300  क्विंटल (4000 ते 4500  रु.), शेवगा – 40 क्विंटल ( 3000  ते 5000 रु.), गाजर -270  क्विंटल ( 1000 ते 1400  रु.),.

 पालेभाज्या – 
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे –
मेथी – एकूण 16  हजार 500  जुड्या ( 500  ते 900 रुपये,), कोथिंबीर – एकूण 29  हजार 600  जुड्या (400 ते 800 रुपये,), शेपू – एकूण3  हजार 200 जुड्या (600  ते 100 रुपये ), पालक – एकूण 3 हजार 950  जुड्या ( 300  ते 500 रुपये),.

 जनावरे –
चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 40  जर्शी गाईपैकी 31  गाईची विक्री झाली. ( 15000 ते 70000 रु.), 95 बैलांपैकी 85  बैलांची विक्री झाली. ( 10000 ते 40000 रु.), 130  म्हशीपैकी 90 म्हशींची विक्री झाली.( 30000 ते 80000 रु.), 10  हजार 200 शेळ्या – मेंढ्यापैकी 9850 शेळ्यांची विक्री झाली. ( 2000 ते 25000 रु.),.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.