Bhosari : ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ट्रॅव्हल्सची धडक (Bhosari) बसली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.24) भोसरी येथील लांडेवाडी झोपडपट्टी जवळ घडला.

अर्जून रामभाऊ गव्हाणे (वय 39, रा. लांडेवाडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ट्रॅव्हल्स चालक तुकाराम लिंबाजी यमगर (वय 31, रा. परळी) याला अटक केली आहे.

Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 43 वर्षीय भाऊ हे रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स चालवून फिर्यादी यांच्या भावाला धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झालेले फिर्यादीचे भाऊ यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर (Bhosari) जखमीला मदत न करता आरोपी तेथून पळून गेला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.