Chinchwad news: माथाडी कामगारांनी अण्णासाहेबांच्या लढ्याची आठवण तेवत ठेवावी – इरफान सय्यद

केसबी चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद व माथाडी कामगारांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

एमपीसीन्यूज – कष्टकरी, गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी आयुष्य वेचणारे व माथाडी कामगारांचे दैवत स्व. अण्णासाहेब पाटील यांची 87 वी जयंती आज शुक्रवारी (दि. 27) पिंपरी-चिंचवड शहरात साजरी करण्यात आली. केसबी चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद व माथाडी कामगारांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माथाडी कामगारांनी अण्णासाहेबांच्या लढ्याची सदैव आठवण तेवत ठेवावी, असे आवाहन सय्यद यांनी या वेळी केले.

यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद, कार्याध्यक्ष मोरे, सरचिटणीस प्रवीण जाधव, सल्लागार बाळासाहेब शिंदे, खंडू गवळी, मुरलीधर कदम, भिवाजी वाटेकर, मारुती कौदरे, सर्जेराव कचरे, संदीप मधुरे, पांडुरंग काळोखे, आबा मांढरे, सतीश कंठाळे, श्रीकांत मोरे, सुनील सावळे, गोरख दुबाले, शंकर शिंदे, गुलाब शिंदे, सोमा फुगे यांच्यासह पिंपरी चिंचवड व चाकण-तळेगाव एमआयडीसीमधील माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इरफान सय्यद म्हणाले की, पाटण तालुक्यातील मंडुळ कोळे या गावी जन्मलेल्या आण्णासाहेबांनी कुटुंबाच्या चरितार्थासाठी मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यानंतर उसाच्या चरकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. तेथुन त्यांनी दारूखाना परिसरात अनेक ठिकाणी ओझे वाहण्याची कामे केली.

ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला आणि मालकांकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळायचे. या तळमळीतूनच त्यांनी माथाडी कामगार चळवळीचा लढा सुरू केला.

तत्कालीन लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा आमलात आणला. त्यांच्या महान कार्यामुळेच आज माथाडी संघटना एक बलाढ्य संघटना म्हणून ओळखली जात आहे. याचे खरे श्रेय त्यांनाच जाते.

अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी, मालवाहू, माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकविले. माथाडी कामगारांनी याची जाणीव ठेऊन त्यांचा लढा पुढे तेवत ठेवण्याचे महान कार्य माथाडी कामगारांनी केले पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.