Chinchwad: गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी महापालिकेने उभारला नाही स्वागत कक्ष

एमपीसी न्यूज – न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी यंदा चिंचवड येथील चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारला नाही. यामुळे गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कक्ष उभारण्यास न्यायालयाच्या निर्णयाचा अडसर असल्याचे कारण पालिकेकडून देण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी कक्ष उभारला जातो. परंतु, यंदा कक्ष उभारण्यात आला नाही. पोलिसांच्या स्वागत कक्षातच पालिकेचे अधिकारी बसले आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेने स्वागत कक्ष उभारले असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेलाच कसली अडचण आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महापौर राहुल जाधव म्हणाले, “सण उत्सवावर खर्च करू नये असा न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे कक्ष उभारण्यात आला नाही. पुढील वर्षी दक्षता घेण्यात येईल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.