Chinchwad : पवना नदी पुन्हा फेसाळली!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना नदी पुन्हा फेसाळली (Chinchwad) आहे. थेरगाव केजूदेवी बंधाऱ्याजवळ पाण्यावर फेस तरंगत आहेत. पावसाळ्यापासून आत्तापर्यंत चारवेळा नदी फेसाळली आहे. याकडे महापालिका प्रशासन, पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणवादी करत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी 24.34 किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी 20.85 किलोमीटर आहे. तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून 10 किलोमीटर अंतर वाहते. तळवडेपासून च-होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे. तर, किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते.

Pimpri Chinchwad : शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत 76वा निरंकारी संत समागम संपन्न

पवना नदी सातत्याने फेसाळत आहे. नदीतील पाण्यावर फेस तरंगतो. नदी प्रदूषित झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात चारवेळा नदी फेसाळली आहे. थेरगावातील केजुदेवी बंधारा ते चिंचवडगावातील श्री मोरया गोसावी घाट या दरम्यान पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली. सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याने सातत्याने नदी फेसाळत आहे. पवनामाईची दुरावस्था झाली आहे. महापालिकेचा नदी सुधार प्रकल्प कागदावरच आहे.

दरम्यान, नागरिक बंधा-यावर कपडे धुतात. कपडे धुतल्याने पाणी फेसाळल्याचे सांगत महापालिका प्रशासन हात वर करते. (Chinchwad) कठोर कारवाई, ठोस उपाययोजना करत नाही. त्यामुळे पर्यावरणवादी नाराजी व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.