Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी 112 जणांवर कारवाई

Pimpri Chinchwad police take action against lockdown violations, file cases against violators

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी रविवारी (दि. 10) 112 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई अविरत सुरू आहे.

4 मे पासून देशभरात लॉकडाऊन 3.0 ला सुरुवात झाली आहे. हा तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी (4 ते 17 मे) लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून यात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. यानुसार नागरिकांच्या अत्यावश्यक कामाशिवाय फिरण्यावर बंधने आली आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात अनेक भागात कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) तयार करण्यात आले आहेत. हे परिसर पूर्णतः सील करून लॉकडाऊनचे नियम कठोर करण्यात आले आहेत. अशी परिस्थिती असताना नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरताना आढळून येत आहेत. ही बाब दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे. पोलीस देखील न कंटाळता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत.

रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (9), भोसरी (2), पिंपरी (4), चिंचवड (14), निगडी (20), आळंदी (0), चाकण (1), दिघी (3), म्हाळुंगे चौकी (4), सांगवी (3), वाकड (1), हिंजवडी (27), देहूरोड (2), तळेगाव दाभाडे (2), तळेगाव एमआयडीसी (2), चिखली (18), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) एकूण 112 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.