Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी 152 जणांवर कारवाई

Chinchwad: Pimpri-Chinchwad police take action against 152 persons लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि. 6) आणखी 152 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत. नागरिकांकडून नियम मोडले जात आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई देखील केली जात आहे.

शनिवारी (दि. 6) पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (5), भोसरी (3), पिंपरी (13), चिंचवड (8), निगडी (29), आळंदी (0), चाकण (0), दिघी (4), म्हाळुंगे चौकी (2), सांगवी (0), वाकड (12), हिंजवडी (29), देहूरोड (15), तळेगाव दाभाडे (12), तळेगाव एमआयडीसी (5), चिखली (11), रावेत चौकी (4), शिरगाव चौकी (0) एकूण 152 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.