Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (Chinchwad) जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील सर्व सुरक्षा दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर झाली आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध पदके जाहीर केली जातात. यासाठी वर्षभर निवड प्रक्रिया सुरु असते.

गुणवत्तापूर्ण सेवा, विशेष कामगिरी याबद्दल ही पदके दिली जातात.केंद्रीय राखीव पोलीस दलातील एकाला शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. देशातील 229 जणांना शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर झाले.

त्यात महाराष्ट्रातील 33 जणांचा समावेश आहे. तर 642 जणांना उत्कृष्ठ सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात महाराष्ट्रातील 40 जणांचा समावेश आहे.

देशभरातील 82 जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. त्यात महाराष्ट्रातील अवघे तीन अधिकारी आहेत. अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांचा समावेश (Chinchwad) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.