Chinchwad: शिवसेनेतर्फे रविवारी ज्येष्ठांचा गौरव

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे येत्या रविवारी (दि.30)ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ज्येष्ठांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.

चिंचवड, येथील अॅटो क्लस्टर सभागृहात रविवारी सकाळी दहा वाजता गौरव सोहळा होणार असून शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात आमदार गौतम चाबुकस्वार, शिवसेना कामगार नेते मनोहर भिसे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, जिल्हा महिला संघटिका शादान चौधरी, कामगार नेते इरफान सय्यद या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठांचा सन्मान केला जाणार आहे.

यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, गटनेते राहुल कलाटे, विधानसभा संघटक अनंत को-हाळे, प्रमोद कुटे, राजू खांडभोर, संघटिका सरिता साने, अनिता तुतारे, आशा देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांचे शहराच्या जडण-घडणीत मोठे योगदान आहे. शहर नियोजनात त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. शिवसेनेतर्फे ज्येष्ठांचा गौरव केला जाणार आहे. संयोजनात जयसिंग पवार, भारत ठाकूर, बाळासाहेब वाल्हेकर, बाबासाहेब भोंडवे, नवनाथ तरस यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like