Pimpri News: शिवम् ज्वेलर्सचे 24 व्या वर्षात पदार्पण; टेम्पल ज्वेलरीसाठी आहे प्रसिद्ध

सोने खरेदी म्हटलं की जास्त डिझायन पाहता याव्यात अशी ग्राहकांची इच्छा असते. शिवम् ज्वेलर्सकडून याची खास काळजी घेण्यात आली असून ग्राहकांना सुरक्षितपणे अमर्याद डिझायन पाहता येतात.

एमपीसी न्यूज – शंभर टक्के शुद्ध सोन्याची हमी आणि विश्वासाचे अतूट नातं जपणाऱ्या शिवम् ज्वेलर्सने 24 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची सुरक्षा आणि सोन्याची शुद्धता याच्याशी तडजोड न करता लॉकडाऊननंतर शिवम् ज्वेलर्सने पुन्हा नवी सुरवात केली आहे.

सतत 23 वर्ष ग्राहकांना 100 टक्के शुद्ध आणि हॉलमार्क असलेले सोन्याची सेवा पुरवणाऱ्या शिवम् ज्वेलर्सने 24 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. याठिकाणी 100 टक्के हॉलमार्क असलेले ए टू झेड व्हरायटीचे दागिने, रेग्युलर दागिने उपलब्ध असून सोने खरेदीसाठी या दालनाला ग्राहक पसंती देत असतात. टेम्पल ज्वेलरीसाठी शिवम् ज्वेलर्स विशेष प्रसिद्ध असून अगदी पुण्यातून सुद्धा यासाठी मोठी मागणी होत असते.

सोने खरेदी म्हटलं की जास्त डिझायन पाहता याव्यात अशी ग्राहकांची इच्छा असते. शिवम् ज्वेलर्सकडून याची खास काळजी घेण्यात आली असून ग्राहकांना सुरक्षितपणे अमर्याद डिझायन पाहता येतात.

शिवम् ज्वेलर्समध्ये टेम्पल ज्वेलरी, कलकत्ता ज्वेलरी तसेच विविध व्हरायटीचे दागिने उपलब्ध आहेत. दालनाला भेट देण्यासाठी नागरिकांसाठी विशेष फोन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यामाध्यमातून त्यांना वेगळा वेळ दिला जातो.

याठिकाणी ग्राहकांना बिल भरण्यासाठी ऑनलाइनसह विविध पर्यायांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. 100 टक्के शुद्ध आणि हॉलमार्क असलेले सोने खरेदीसाठी ग्राहकांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे. शिवम् ज्वेलर्सची सेवा आणि विश्वासहार्यतेबद्दल समाधान व्यक्त करतात.

शिवम् ज्वेलर्सच्या 1200 चौरस फूट असलेल्या या भव्य दालनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक आणि काऊंटर यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यात आले आहे. दालनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर, मास्क व हॅंड ग्लोव्हज इत्यादी गोष्टी पुरवल्या जातात.

दालनात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाईल याची विशेष काळजी घेतली जाते. दालनात येणाऱ्या ग्राहकांना त्यांची वाहने पार्किंगसाठी सोय करून देण्यात आली आहे.

शिवम् ज्वेलर्स 23 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असून त्यांनी सोने विक्रीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आमच्या येथे विविध व्हरायटीचे दागिने उपलब्ध असून शहरातील एक अग्रगण्य दालन म्हणून आमची ओळख आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन शिवम् ज्वेलर्सकडून करण्यात आले आहे.

संपर्कासाठी पत्ता- शिवम् ज्वेलर्स
साई शिव कॅार्नर, नेहरू नगर
पिंपरी- 411018
संपर्क क्रमांक – (020-27425501/02) / 9373440453

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.