Chinchwad : थेरगावातील शिवसृष्टीचे उद्‌घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 24 मधील थेरगाव येथे विकसित करण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उदघाटन व सर्व्हे नंबर 22 येथील क्रीडांगणाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. या कार्यक्रमाला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या झामाबाई बारणे, माया बारणे, अर्चना बारणे, मनीषा पवार, नगरसदस्य निलेश बारणे, सचिन भोसले, अभिषेक बारणे, माजी नगरसदस्य सिध्देश्वर बारणे, संतोष बारणे, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता बाबासाहेब गलबले, उपअभियंता विजय काळे आदी उपस्थित होते.

थेरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील प्रसंगांची शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. त्यामध्ये 32 म्युरल्स आहेत. त्यासाठी सुमारे 2 कोटी 88 लाख रुपये खर्च झाला आहे. तसेच थेरगाव येथील स.नं. 22 मध्ये क्रीडांगण उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजनही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.