Pune : मनाचे श्लोक सामूहिक पठणातून 11 हजार 631 विद्यार्थ्यांनी केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरिता प्रयत्न

पुण्यातील 64 शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- ‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे…’ या मनाच्या श्लोकातील स्वरांनी 11 हजार 631 विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक सामुहिक पठणातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरीता प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ… हा जयघोष आसमंतात दुमदुमला आणि जागतिक विक्रमाच्या या उपक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी हजारो पुणेकरांनी अनुभवली. पुणे शहर आणि उपनगरांतील ६४ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

निमित्त होते, निनाद पुणे, ओरायन स्टुडिओज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारिका साऊंड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ११ हजार ६३१ शालेय विद्यार्थ्यांच्या श्री मनाचे श्लोक पठणाच्या उपक्रमाचे. उपक्रमाचे मुख्य संयोजक निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, ओरायन स्टुडियोजचे आशिष केसकर, समर्थ व्यासपीठ पुणेचे डॉ.राम साठये, द्वारिका साऊंड पुणेचे बाबा शिंदे यांनी आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.