Chinchwad News : रावेत पोलीस ठाण्यास शासनाची मान्यता

  • एमपीसी न्यूज – देहूरोड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या रावेत पोलीस चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. पोलीस ठाण्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर अन्य साहित्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करून रावेत पोलीस चौकीचे रूपांतर नवीन पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले आहे. रावेत पोलीस चौकीसाठी एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 9 पोलीस हवालदार, 18 पोलीस नाईक, 36 पोलीस शिपाई अशा 71 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

सध्या रावेत पोलीस चौकीमध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चार पोलीस हवालदार, चार पोलीस नाईक, 19 पोलीस शिपाई असे 31 पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या रावेत पोलीस  स्टेशनसाठी एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पाच पोलीस हवालदार, 14 पोलीस नाईक, 17 पोलीस शिपाई अशी 40 पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नवनिर्मित रावेत पोलीस स्टेशनसाठी 15 लाख 54 हजार पाचशे रुपये इतक्या अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.