Pune Crime News : पोलीस अंमलदार निलंबित, पोलीस उपायुक्तांच्या अहवालात खाडाखोड करणे भोवले

एमपीसी न्यूज – पोलिस उपायुक्तांच्या अहवालात परस्पररित्या खाडाखोड करणे एका पोलीस मतदाराला चांगलेच भावले आहे. पुणे पोलीस दलातील परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी संबंधित कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले आहे.

पोलीस नाईक स्वप्नील बारटक्के असे निलंबित केलेल्याचे नाव आहे. त्याने पौर्णिमा गायकवाड यांच्या प्रस्तावात परस्पर स्वहस्ताक्षरात खाडाखोड करुन कालावधीत बदल केलेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी पोलीस अंमलदाराचे पोलीस खात्यातून निलंबन केले आहे.

स्वप्नील बारटक्के यांची उत्तमनगर पोलीस ठाण्यात नेमूणक होती. पण, त्यांना परिमंडळ तीनच्या कार्यालयात प्रतिनियुक्ती दिली होती. कोथरुड येथील एका गुन्ह्यात प्रस्तावित कार्यवाहीबाबत अभिप्राय मिळविण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी केला होता.

तो शिवाजीनगर येथील जिल्हा सरकारी वकिलांकडे देण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी बारटक्के यांच्याकडे दिला होता. त्यांनी या प्रस्तावात पोलीस उपायुक्त यांची पूर्व परवानगी न घेता परस्पर स्वहस्ताक्षरात त्यांच्या प्रस्तावात नमूद केलेल्या दिवसाच्या कालावधीच्या जागी 1 खोडून 7 अशी खाडाखोड केली. तसेच, कालावधी बदल केलेला अहवाल जिल्हा सरकारी कार्यालयात दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.