Chinchwad : ‘त्या’ रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर दोन दिवसांत कारवाई करा; अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) पक्षाचा इशारा

एमपीसी न्यूज – स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये दातांच्या शस्त्रक्रियेनंतर एका रुग्णांचा मृत्यू झाला. डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी शेकापच्या महिला अध्यक्षा छायावती देसले यांनी आयुक्तांकडे मागणी केली. तसेच याबाबत कारवाई न केल्यास शेकाप पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, स्टर्लिंग हॉस्पिटल येथे दि. २३ एप्रिलला धनश्री जाधव (वय १९) हिच्या दातांमध्ये दोष असल्याने शस्त्रक्रिया करुन ते दोष दूर करायचे होते. दुपारी बारा वाजता सुरु झालेली शस्त्रक्रिया साधारण चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण होईल, असे शस्त्रक्रिया करणा-या डॉ. पाटील दाम्पत्यांने रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले.

  • पण, शस्त्रक्रिया दरम्यान तिच्या नाकातोडांतून रक्ताचा अतिस्त्राव सुरु झाला. योग्य ती काळजी न घेतल्याने तसेच शस्त्रक्रिया दरम्यान आणि त्यानंतर हलगर्जीपणामुळे धनश्रीचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. पाटील दाम्पत्यांना अटक करुन त्यांची चौकशी करावी. तसेच याबाबत दोन दिवसांत योग्य ती कार्यवाही न झाल्यास शेकापच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.