Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 423 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 423 जणांवर सोमवारी (दि. 20) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराला रविवारी संक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पूर्णपणे सील करण्यात आले आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनची मुदत पुन्हा 3 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊन सोबतच संचारबंदीचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. मात्र शासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, संचारबंदी आदेशाचा भंग करून मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (4), भोसरी (19), पिंपरी (5), चिंचवड (16), निगडी (4), आळंदी (5), चाकण (3), दिघी (22), म्हाळुंगे चौकी (3), सांगवी (44), वाकड (15), हिंजवडी (37), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (9), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (27), रावेत चौकी (2), शिरगाव चौकी (3) एकूण 224 जणांवर कारवाई केली आहे.

तर सीआरपीसी 149 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (82), भोसरी (3), पिंपरी (4), आळंदी (3), दिघी (16), सांगवी (7), हिंजवडी (5), देहूरोड (5), तळेगाव दाभाडे (10), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (10), रावेत चौकी (35), शिरगाव चौकी (9) एकूण 192 जणांवर कारवाई केली आहे.

याव्यतिरिक्त पिंपरी, चिंचवड, सांगवी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, हिंजवडी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन असे सात गुन्हे मुंबई पोलीस कायदा कलम 65 ख, ड, ई, फ नुसार दाखल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.