Vadgaon : अन्नछत्रालयास नगरसेवक सुनील ढोरे यांच्याकडून भरीव मदत

एमपीसी न्यूज : आमदार सुनील शेळके यांनी सुरू केलेल्या ‘मदत नव्हे कर्तव्य’ या उपक्रमाअंतर्गत वडगाव नगरपंचायत व लोकसहभागातून गरजू कुटुंबासाठी सुरु केलेल्या अन्नछत्रालयाची खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी पाहणी केली.

यावेळी नगरसेवक सुनिल ढोरे आणि सह्याद्री फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या अन्नछत्रालयास १२५० किलो तांदूळ व ५ तेलाचे डबे देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा मायाताई चव्हाण, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगरसेवक राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शरद हुलावळे तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाच्या संकटप्रसंगी वडगाव नगरपंचायतने लोकसहभागातून सुरु केलेल्या अन्न छत्रालयास उद्योजक सुनील शिंदे यांच्या वतीने पाच हजार रूपये, विनय सुर्वे यांच्याकडून तीन हजार रुपये, अनिल दंडेल यांच्याकडून ५० किलो तांदूळ, सनी सुराणा यांच्याकडून २०० किलो तांदूळ व १ तेल डबा देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.