Pune : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 60 जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – संचारबंदीचे पालन न करणाऱ्या 60 जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत घराबाहेर फिरल्याप्रकरणी 34 जणांवर, तर मास्क न घालणाऱ्या 26 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच संबंधित नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलिसांकडून या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांनी संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत घराबाहेर फिरल्याप्रकरणी 34 जणांवर तर मास्क न घालणाऱ्या 26 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच संबंधित नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

आरोपींना पोलीस तात्काळ न्यायालयात हजर करत असून न्यायालय संबंधितांना दंड अथवा कैदेची शिक्षा सुनावत आहे. संचारबंदी सुरू असताना नागरिकांनी संचार बंदीचे उल्लंघन केल्यास संबंधितांना पोलिसांकडून दिले जाणारे दाखले आणि परवाने भविष्यकाळात मिळणार नाहीत, असे पुणे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.