Chinchwad : मराठा आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लावण्याची शहरातील आमदारांकडे मागणी

एमपीसी न्यूज – मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न(Chinchwad) येत्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावण्याची मागणी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शहरातील आमदारांकडे करण्यात आली. संघटनांच्या वतीने आमदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

7 डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून ही योग्य मागणी आहे. हा प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मार्गी लावण्यासाठी पाठ पुरवा करण्याचे आश्वासन शहरातील सर्व आमदारांकडून क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळास देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, प्रकाश बाबर, मीरा कदम, जयराम नाणेकर आदी उपस्थित होते.

चिंचवड विधानसभेच्या आमदार(Chinchwad) अश्विनी लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्वीकारले. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण देण्यासाठी सरकारकडे पाठपुरवठा करणार हिवाळी अधिवेशनात याविषयी आवाज उठवणार असल्याचे आश्वासन शहरातील सर्व आमदारांनी शिष्टमंडळास दिले.

Wagholi : स्कूल बस झाडावर आदळल्याने भीषण अपघात; विद्यार्थी जखमी तर चालकावर कारवाई करण्याची मागणी

मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकाऊ असे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देण्यात यावेत. सर्व समाजास न्याय मिळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी. आवश्यक असेल तर केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करून घटना दुरुस्ती करावी अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने करण्यात आल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.