Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील 1086 मंडळांचे आज विसर्जन

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाचा आज (गुरुवारी, दि. 28) अखेरचा दहावा दिवस आहे. आज पिंपरी-चिंचवड (Chinchwad) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 1086 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेश विसर्जन करणार आहेत. सर्वाधिक मंडळे आज गणेश विसर्जन करणार आहेत.

Chinchwad : माजी नगरसेवकावर खुनी हल्ला करणारा आरोपी चार वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात

दहाव्या दिवशी पिंपरी, चिंचवड , निगडी, देहूरोड, वाकड, चाकण, महाळुंगे, आळंदी, दिघी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक विसर्जन मिरवणूका निघतात. त्यामुळे दहाव्या दिवशी या भागावर पोलिसांचे सर्वाधिक लक्ष असते.

गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ध्वनीपातळीपेक्षा जास्त आवाज होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सर्व गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी केले आहे. ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज झाल्यास संबंधित मंडळांवर कारवाई केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक असे एकूण 18 नाॅइज लेव्हल (डेसीबल) मीटर उपलब्ध आहेत. या मीटरचे रीकॅलीब्रेशन करून घेण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणुकांमध्ये याद्वारे आवाजाची पातळी तपासली जाणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आपल्या मंडळाची मिरवणूक अधिक चांगली झाली पाहिजे, याची चढाओढ असते. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारी मंडळे खास आकर्षक सजावट करतात. डीजे, ढोल ताशा, झांज आणि लेझीम पथकांना देखील यात समाविष्ट करून घेतले जाते.

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अधिकची खबरदारी घेतली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. त्याचबरोबर अन्य विविध प्रकारची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.

स्थानिक प्रशासनाकडून शहरात जागोजागी कृत्रिम विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. त्यात विसर्जन करण्याची सोय केली आहे. विसर्जित झालेल्या मुर्त्यांचे संकलन तसेच निर्माल्याचे देखील संकलन केले जात आहे. आनंदी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.

ध्वनीक्षेपकास परवानगी
विसर्जनाच्या दहाव्या दिवशी ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे आज (गुरुवारी, दि. 28) रात्री बारा पर्यंत ध्वनिक्षेपक वाजतील. त्यानंतर मात्र, मंडळांना आपल्या डीजेला म्युट करावे लागणार आहे.

पोलीस स्टेशन निहाय विसर्जन होणाऱ्या मंडळांची संख्या
परिमंडळ एक
पिंपरी – 114
भोसरी – 58
चिंचवड – 56
निगडी – 79
सांगवी – 25

परिमंडळ दोन
तळेगाव एमआयडीसी – 45
तळेगाव दाभाडे – 10
देहूरोड – 69
शिरगाव – 35
रावेत – 16
वाकड – 83
हिंजवडी – 21

परिमंडळ तीन
चाकण – 71
महाळुंगे एमआयडीसी – 109
आळंदी – 90
दिघी – 72
एमआयडीसी भोसरी – 60
चिखली – 71

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.