Chinchwad : माजी नगरसेवकावर खुनी हल्ला करणारा आरोपी चार वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad) येथील माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर कोणी हल्ला करणारा आरोपी चार वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला चिंचवड मधून बुधवारी (दि. 27) ताब्यात घेतले.

Thergaon : नागरी आरोग्य पोषण दिन साजरा

गणेश उत्तम घोलप (वय 45, सध्या रा. खारघर नवी मुंबई. मूळ रा. तानाजी नगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथकातील पोलीस बुधवारी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान पेट्रोलिंग करीत होते. चिंचवड येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आशिष बोटके यांना माहिती मिळाली की, सन 2019 साली चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी चिंचवड मधील उदय मित्र मंडळ येथे येणार आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयित आरोपी गणेश घोलप याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सन 2019 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर खुनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.