Thergaon : नागरी आरोग्य पोषण दिन साजरा

एमपीसी न्यूज – थेरगाव रुग्णालया अंतर्गत ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात आमदार अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत नागरी आरोग्य पोषण दिन साजरा करण्यात आला.

Pune : आज गणरायाचे विसर्जन महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज

माजी नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषा मुंडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र फिरके, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र मंडपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास सोमवंशी सर उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरामध्ये संशयित क्षयरुग्नांची नोंदणी करून त्यांचे थुंकी नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आले. तसेच आलेल्या सर्व नागरिकांना क्षयरोगाचे प्रकार,लक्षणे, तपासणी,उपचार,आहार,औषधेफॉलो अप,निक्षय पोषण योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. क्षयरोग माहिती पत्रके वाटप करण्यात आले. क्षयरोगजनजागृती कार्यक्रमासाठी डेंग्यू,मलेरिया कामकाज नितीन कुंभार, विक्रांत कांबळे,रघुनाथ साळवे, संजय कोळी, नितीन गोगावले यांनी योगदान दिले. राणी भोई, वंदना गवारी आणि सर्व आशास्वयंसेविका, कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.