Chinchwad : घटस्फोटास प्रवृत्त केल्याने पतीची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – घटस्फोटासाठी पतीचा (Chinchwad) शारीरिक व मानसिक छळ करत त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी व तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 31 डिसेंबर 2022 ते 14 जून 2023 या कालावधीत परभणी तसेच चिंचवड येथे घडला.

शंकर लक्ष्मण पात्रे (वय 32) असे मयत पतीचे नाव असून याप्रकऱणी त्यांचे वडील लक्ष्मण संभाजी पात्रे (वय 65 रा. चिंचवड) यांनी मंगळवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. मुलाची पत्नी, रमेश महादू धुमाळ (वय 65 रा. परभणी), सासू,गणेश रमेश धुमाळ (वय 40), विशाल रमेश धुमाळ (वय 23), दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Hinjawadi : बावधन मध्ये मजुराचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलाला आरोपी पत्नीने व तिच्या घरच्यांनी लग्नासाठी म्हणून बोलावून फिर्यादीच्या मुलाकडून 10 हजार रुपये काढून घेतले. तसेच घटस्फोट दे म्हणत शारीरिक व मानसीक छळ केला.

शिवीगाळ करून त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून पत्नी व तिच्या घरच्यां विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत (Chinchwad)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.