Chinchwad : वनिता सांवत यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण भूषण पुरस्कार’ प्रदान

एमपीसी न्यूज- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 189 वी जयंती निमित्त चिंचवड येथे महात्मा जोतिबा फुले मंडळ यांच्या वतीने आयोजित सावित्रीमाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षिका वनिता संदीप सांवत यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

लहान वयामधील शैक्षणिक क्षेत्रामधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप होते. या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सावंत म्हणाल्या की, कोणतीही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व वंडरलड स्टाॅफचा या यशामध्ये सिंहांचा वाटा आहे. त्यांच्या अथक मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे.

यावेळी महापौर उषा ढोरे, प्रथम महिला महापौर अनिता फरांदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी महापौर अपर्णा डोके,पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, नगरसेविका अश्विनी जाधव, संगीता ताम्हाणे, रेखा दर्शले, सुवर्णा बुर्डे, स्विनल म्हेत्रे, माधवी राजापुरे, माजी नगरसेविका भारती फरांदे, समता परिषद अध्यक्षा वंदना जाधव, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, बाळासाहेब वाल्हेकर, माळी महासंघाचे विश्वस्त काळूराम गायकवाड, शारदा बाबर, दत्तात्रय बाळसराफ, स्नेहल बाळसराफ, आनंदराव कुदळे, दीपक जगताप आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.