Chinchwad : प्रबोधन मंच व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने ‘देशहिताचे भान, 100 टक्के मतदान’ अभियान

एमपीसी न्यूज – मतदानाच्या कर्तव्यपालनाचा, योग्य शासनाच्या निवडीचा, लोकशाहीवरील आपला दृढ विश्वास व्यक्त करण्याचा 29 एप्रिल हा मतदानाचा हक्काचा दिवस आहे. या दिवशी 100 टक्के मतदान करावे असे आवाहन प्रबोधन मंच व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने डांगे चौक, थेरगाव येथे करण्यात आले. यावेळी घोषणा देत, पत्रक वाटत नागरिकांना 100 टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य अशोक पारखी, गतिराम भोईर, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, मुख्याध्यापक नटराज जगताप, अश्विनी बावीस्कर, खिंवसरा पाटील शिक्षण संकुलाचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच प्रा. डाॅ. प्रसाद वायकुळे , मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संचालक सुहास गौडसे व त्यांची कन्या संस्कृती गौडसे पण उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.